जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | एका ८५ वर्षीय मुरलीधर शंकर निकुंभ रा. महाबळ कॉलनी जळगाव यांचे एक महिन्याचे फ्रॅक्चर होते. रुग्णाचे वय ८५ असल्याने व त्यांना ह्रदयाचा आजार , फुफुसाचा आजार असल्याने त्यांच्यावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया हाय रिस्क असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले होते. मात्र श्री. गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांनी हा धोका पत्करून उजव्या खुब्याचा बॉलचे बदल सिमेंटेड मॉड्युलर बायपोलार यांचे सांधेरोपण करून दिले. मुरलीधर निकुंभ यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वॊकरच्या साहाय्याने चालविण्यात आले. ५ व्या दिवशी कुणाचेही सहकार्य न घेता स्वतः चालत गेले . याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफ चे आभार मानत दुसर्यावर अवलंबून न राहता जीवन जगण्याचा आनंद हा वेगळाच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
यांचे लाभले सहकार्य
आर्थोपेडिक सर्जन डॉ. अभिजित पाटील,आयसीयू तज्ज्ञ डॉ. प्रियांका पाटील, डॉ. तेःजेश पाटील डॉ. भूल तज्ञ ललित पाटील, डॉ. स्नेहल गिरी, डॉ. अशी अन्वर, डॉ. अमित नेमाडे, डॉ. नितीन पाटील यांचे व रुग्णालयातील स्टाफचे सहकार्य लाभले