जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | अरविंद एंटरटेनमेंट निर्मित ‘वेड लागले’ या मराठी ऑफिशियल अल्बम गीताचे गेल्या महिन्यात पाल व मध्यप्रदेश येथील निसर्गरम्य ठिकाणी शूट झाले असून याचे १४ ऑगस्ट रोजी इंटरटेनमेंटच्या ऑफिशियल यूट्यूब चैनलला या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
गीताचे दिग्दर्शन प्रदिप भोई यांनी केले आहे. बंधन प्रोडक्शन आणि भाग्यदीप म्युझिक यांच्या संयुक्त विद्यमाने या गीताची निर्मिती करण्यात आली असून, प्रवीण लाड , पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी गाण्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे. सोबतच नेहा वंदना सुनिल, खुशबू शिंदे, ऋतिका पाटील, रितेश इंगळे आणि अजय सोनवणे यांनी सह कलाकाराची भूमिका निभावली आहे. गाण्याचे बोल हे प्रवीण लाड यांचे असून, गीत निर्मिती (कम्पोसिंग) प्रवीण लाड आणि कुणाल पवार यांनी तर गीत गायन कुणाल पवार आणि प्रिया बुरुकले यांनी केले आहे. खान्देशातील सुप्रसिद्ध ‘डीजे प्रमोद’ यांनी गाण्याला रिदम व म्युझिक दिले आहे.
चित्रीकरण आणि संकलनात नामांकित बंधन प्रोडक्शन ( योगेश ठाकूर) आणि ब्लॅक व्हाइट सिनेमा (दिपराज गाढे) यांनीही गाण्यामध्ये चित्रीकरण भूमिका साकारली आहे. ड्रोन पायलट म्हणून जामनेर येथील मनोज तडवी यांनी काम केले आहे. सुप्रिया ढोके यांनी वेशभूषा तर खुशबू शिंदे यांनी मेकअप आणि कोरिओग्राफी केली आहे.
‘तुझे पैंजण’ या मराठी रोमॅंटिक गाण्यानंतर अरविंद इंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एक धडाकेबाज रोमँटिक सोंग घेऊन येत आहे. प्रेक्षकांकडून फर्स्ट लूक नंतर गाण्याची आतुरतेने वाट पहिली जात असून, वेड लागले हे गीत प्रेक्षकांना युट्युब आणि टीव्हीवरही लवकरच बघायला मिळणार आहे. याच महिन्यामध्ये गाणे प्रदर्शित होणार असून रसिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.