जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील फरार आरोपी विलास सुपडू वाघोदे (वय २१) रा. वडगाव, रावेर हा गुन्हा झाल्यापासून फरार होता. त्याला गुन्हा शाखेच्या पथकाने राहत्या घरून जेरबंद केले आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील गु.र.न. २५८/२०२१ भादवि कलम ३८०, ४०६ या गुन्ह्यातील फरार आरोपी विलास सुपडू वाघोदे (वय २१) रा. वडगाव, ता रावेर हा गुन्हा झाल्यापासून फरार होता. पोलीस निरीक्षण किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्याला सदर पथकाने राहत्या घरून अटक केली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला रावेर पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दिलेल्या सूचनेनुसार सहायक फौजदार अशोक महाजन, पोलीस हवलदार अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, चालक अशोक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.