जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पहूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मोबाईल चोरी करणारे दोन अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहूर पोलिस स्थानकातील गु.र.न. २८४/२०२१ भा द वि कलम ३७९.३४ या गुन्ह्यातील चोरी झालेला दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग एम १२ मोबाईल, सलमान पिंजारी (वय २४) रा. पहूर, जामनेर आणि समीर सत्तार पिंजारी (वय २१) रा. शाहूनगर, जळगाव यांनी चोरी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. या अंतर्गत दोघांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले. त्यांचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याच्या तपास कामी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील माहिती घेऊन पंचनामा करून आरोपींकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला.
दोघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पहूर पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या सहायक फौजदार अशोक महाजन, पोलीस हवलदार अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागूल, रमेश चौधरी, चालक मुरलीधर बारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.