(राजमुद्रा मुंबई) कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्र राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर तसेच प्रतिनिधी हेदेखील बातम्यांच्या शोधात राज्यभर फिरत बातमी मिळवत असल्यामुळे राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईट वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांना तातडीने कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी अशी विनंती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव येथे नुकतेच पत्रकारांचे लसीकरण पार पडले आहे. देशातील इतर राज्यांनी ज्याप्रमाणे अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध केल्या त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही अशा पद्धतीने लसीकरणाचा फायदा उपलब्ध करून पत्रकारांना व त्यांच्या परिवाराला कोरोना पासून संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी मागणी स्वछता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून केली आहे.