पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी जहरी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली होती. गायकवाड यांची ही टीका मनसेला चांगलीच झोंबली असून मनसे कडून गायकवाड यांना प्रतुत्तर मिळाले आहे. “तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”, असा दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला आहे.
वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा देऊन ते म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय. एवढेच काय ‘मी प्रविण गायकवाड’, असं स्वत:चं नाव लोकांना सांगत होतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.