भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ येथील रेल्वे विभागीय कार्यालयात सीबीआयच्या पथकाने अचानक धाड टाकल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यात रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
भुसावळ शहरातील रेल्वेच्या विभागीय कार्यालयात भुसावळ रेल्वे मंडळाचा प्रशासकीय कारभार चालतो. या डीआरएम ऑफिस मध्ये आज दुपारच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने अचानक धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कारवाईचा पूर्ण तपशील समोर आला नसला तरी यात दोन अधिकाऱ्यांना रंगेहात लाच घेताना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
डीआरएम ऑफिस मध्ये झालेल्या या कारवाईत सिनिअर डिव्हिजन इंजिनियर एम ए गुप्ता आणि मुख्य कार्यालयीन अधिकारी संजीव रडे या दोन अधिकाऱ्यांना रंगेहात ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली जात आहे.