पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी मधील घोटाळा प्रकरणी अखेर अनेक दिवसांपासून फरार असलेले संशयित आरोपी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांचा आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राज्यात सध्या बीएचआर घोटाळा प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेकांना गजाआड केले. तसेच नवनवीन माहिती उजेडात येत असल्यामुळे याप्रकरणी चर्चा रंगली आहे. दरम्यान, गेल्या एक दीड महिन्यापासून आमदार चंदूलाल पटेल हे पोलिसांना सापडत नव्हते. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाला आहे आहे. मात्र पुणे न्यायालयाने त्यांना आज अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.