जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक सेल तर्फे कलावंत परिचय मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक सेल खान्देश विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महानगर युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सचिव कुणाल पवार, खानदेश विभागीय उपाध्यक्ष सौ कल्पना पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक सेल खानदेश विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सौदागर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील लोककलावंतांचा परिचय मेळावा व कलावंतांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता लोककलावंत, नाट्यकलावंत बेरोजगार झालेले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्याचबरोबर लोककलावंतांना व नाट्य कलावंतांना कशा प्रकारे मदत करता येईल याची आखणी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी चर्चा करून लोककलावंतांना व नाट्य कलावंतांना कशा पद्धतीने अनुदान देता येईल यावर विचार केला जाईल. सोबतच वयोवृद्ध कलावंतांच्या पेन्शनसाठी वाढ केली जाईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रा. सत्यजित साळवे, प्रवक्ता सेल अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल प्रमुख सल्लागार रमेश भोळे, जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक सेल गौरव लवंगले व उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, पथनाट्य कलावंत विनोद ढगे, दीपक पाटील, अनिल मोरे, श्रीकांत चौधरी, प्रेम कुमार बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक सेल रावेर तालुका अध्यक्ष कुणाल पवार, प्रदीप भोई, लोककलावंत समाधान जोगी, अशोक जोगी आदी उपस्थित होते.