पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | आपण उपस्थित केलेले सर्व प्रश्न नागरिकांच्या हिताचे आहेत. आपण त्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून प्राधान्याने हे प्रश्न सोडवू असे. स्पष्ट प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे अंकिता यांचे वडील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नवे केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर एका आठवड्यानंतर अंकिता पाटील यांनी पुण्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
या भेटीबाबत मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्यपालांना विविध मागण्यांचे निवेदनही त्यांनी दिले. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नियुक्ती करणे, अकरावी प्रवेश प्रक्रिया पारदर्शीपणे राबविणे, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासंदर्भात पूर्व परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करून परीक्षा घेणे, यासह पुणे ग्रामीण इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सक्तीने केली जाणारी वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांना जि प सदस्य अंकिता पाटील यांनी केली आहे.