यावल राजमुद्रा वृत्तसेवा | जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर चिंचोलीच्या तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गणेश शिवाजी पाटील, रा. चिंचोली, ता. यावल असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शरद भालेराव, महेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.