जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहीदांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्याची फळे आपण आज चाखत आहोत. परंतु ही गोड फळे चाखत असताना देशाप्रती असलेली आपली कर्तव्यभावनाही प्रत्येकाने जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात देवकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी देवकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित हस्तलिखिताचे प्रकाशन देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी आयोजित आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉ. द्वारकाधीश निकुंभ, मजूर फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे, देवकर अभियांत्रिकीचे प्राचार्य सी एस पाटील, तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य डॉ. एम पी पाटील, अभियांत्रिकीचे रजिस्टार डॉ. विकास निकम, प्राचार्य डॉ. योगेश पवार, प्राचार्य डॉ. नितीन पाटील, डॉ. नितीन पाटील, प्राध्यापक किरण नेते, डॉ शीतल कुमार देशमुख आदी उपस्थित होते.