मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. १९ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. मुंबईत देखील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी प्रामुख्याने पश्चिम विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. १८ ऑगस्ट साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.