भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी दोन लाख चाळीस हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता एम. एल. गुप्ता व अभियांत्रिकी विभागातील कार्यालय अधीक्षक संजय रडे यांना दोन लाख चाळीस हजारांची लाच कार्यालयातच स्वीकारताना नागपूर सीबीआयच्या पथकाने १६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील दालनातच अटक केली होती. दरम्यान संशयित आरोपींना मंगळवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना २० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, मलकापूर येथील एम. एन. वाय. कन्सल्टिंग प्रा. लि. कंपनीने विविध कामासंदर्भात तीन निविदा भरल्या होत्या. त्यातील एक निविदा रद्द झाली, मात्र दोन निविदा सर्वात कमी दराची असल्याने त्या ऑनलाइन मंजूर करण्यात आल्या होत्या. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी संशयित आरोपी गुप्ता यांनी चार लाख तर संजय रडे यांनी चाळीस हजारांची लाच मागितल्याने नागपूर सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. काम होण्यापूर्वी दोन लाख व वर्कऑर्डर मिळाल्यानंतर गुप्ता यांनी चाळीस हजारांची मागणी केली होती.