जळगाव राजमुद्रा वृत्त सेवा | शहरातील मध्यवर्ती भागातील पोलन पेठ परिसरातील जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या देशी व विदेशी दारू दुकानातून शासनाचे नियम धाब्यावर बसवीत मद्य विक्री करण्यात आल्याचे नुकतेच निरदर्शनास आले असता यावेळी स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी आपल्या कॅमेऱ्यात हा धक्कादायक प्रकार कैद केला आहे. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजला असताना मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असताना शहराचे आमदार असलेले राजुमामा भोळे यांच्या दुकानातून मद्य विक्री होणे सामान्यांना पचनी न पडणारे आहे.
जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात नियम न पडल्यास गोर-गरीब भाजीपाला व्यावसायिकांवर कार्यवाही करते त्यांचा सामान देखील साहित्य विक्री करीता आणलेला माल देखील जप्तीची कार्यवाही करण्यात येते सर्व सामान्य नागरिक आस्मानी व सुलतानी संकटाला झुंज देत असताना जिल्हा प्रशासन नेहमी नियमावर बोट ठेवून कार्यवाहीचा बडगा उगारत आहे. मात्र उदरनिर्वाहासाठी करणार तरी काय हा सवाल सामान्य जनतेपुढे आहे. प्रशासनाकडून सगळंच टार्गेट करण्यात आलं मात्र दारू दुकानांना सोईस्कर मुभा देण्यात आली की काय ? हा प्रश्न प्रत्येकासाठी गहन आहे.
यापूर्वी देखील आमदारांच्या ह्याच दुकानावर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी कोरोनाकाळात नियम पायदळी तुडवत मद्याची विक्री केली म्हणून परवाना रद्द करण्याची कार्यवाही केली होती. नाशिक विभागाकडून झालेल्या ह्या कार्यवाही काही धक्कादायक बाबी उघडकीस आला होत्या आता तोच कित्ता पुन्हा गिरवण्यात आला आहे.