जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्याने त्या १८ ऑगस्ट रोजी हजर राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या राज्यात पुणे भोसरी येथील जमीन प्रकरण गाजत असताना खरसे कुटुंबियांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणात या पूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत असून या जमीन खरेदी खरेदीत दुसरे खरेदीदार मंदाताई खडसे या आहेत. सक्तवसुली संचालनालय मुंबई यांनी यापूर्वी मंदाताई खडसे यांना समन्स बजावले असता त्यांनी हजर राहण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. दरम्यान ईडीने पुन्हा समन्स काढून त्यांना बुधवारी कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले आहे.