जालना राजमुद्रा वृत्तसेवा | पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची फिरकी घेतली आहे. तसेच जनता भाजपला घरी पाठवण्याचाच आशीर्वाद देईल, असा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे. आज जाळण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न आणखी वाढवायचे आहेत म्हणून की पेट्रोलची डबल सेंच्युरी करायची म्हणून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे का?, असा सवाल करत जनता आता भाजपला घरी पाठवण्याचा आशीर्वाद देईल अशी टीका पटोले यांनी केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना आरक्षण मुद्यावरून हार आणि फेटे न घालण्याचा संदर्भ घेऊन देखील टोमणा मारला.
दुसऱ्याच्या घरात झाकून बघण्याचे काम काँग्रेसचे नसून ते भाजपचे काम आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांचीच प्रायव्हेसी संपवून हेरगिरीचे काम केल्याचा आरोप करत अशा विक्षिप्त मानसिकतेच्या लोकांनी देशाच्या राजकारणात येऊन देशाचा सत्यानाश केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.