जळगाव सह नाशिक परिक्षेत्रात बदली सत्र
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | नाशिक परिक्षेत्रातील बदली कालावधी पूर्ण झालेल्या १९ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक अष्वती दोर्जे यांनी मंगळवारी काढले आहेत. बदल्या झालेल्या अधिकार्यांमध्ये जळगावच्या आठ सहाय्यक निरीक्षक यांच्यासह नंदुरबारच्या एका निरीक्षकांचा समावेश आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात नव्याने सहा अधिकारी बदलून येणार आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप राठोड अहमदनगर हुन जळगाव येथे, अशोक मेहुणकर धुळे येथून नाशिक ग्रामीण येथे, दिलीप खेडकर धुळे येथून नाशिक ग्रामीण येथे, रमेश चव्हाण धुळे येथून जळगाव येथे, सचिन बेंद्रे जळगाव येथून धुळे येथे, प्रकाश वानखेडे जळगाव येथून नंदुरबार येथे, राजेश काळे जळगाव येथून अहमदनगर येथे, हनुमान गायकवाड जळगाव येथून धुळे येथे, प्रकाश सदगीर जळगाव येथून मुदतवाढ, संदीप आराख जळगाव येथून नंदुरबार येथे, रवींद्र जाधव जळगाव हुन नाशिक येथे, नाशिक ग्रामीण येथे, रवींद्र बागुल जळगाव ऊन अहमदनगर येथे, दिगंबर शिंपी नंदुरबार हुन धुळे येथे, विलास तोटीकौडलवार नाशिक ग्रामीण येथून निलंबित असल्याने सध्याच्या घटकात, गणेश गुरव नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे, जालिंदर पवळे नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे, शिवचरण पांढरे नाशिक ग्रामीण येथून मुदतवाढ, आशिक कुमार आडसूळ नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे, मच्छिंद्र दवे नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे अशा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जनरल बदल्या करण्यात आल्या आहेत.
तर राजेश गवळी अहमदनगर हुन नाशिक ग्रामीण येथे, पूनम राऊत धुळे येथून नाशिक ग्रामीण येथे, मयूर भामरे जळगाव येथून धुळे येथे, सचिन जाधव जळगाव येथून अहमदनगर येथे, शिवाजी बडे नाशिक ग्रामीण येथून जळगाव येथे अशा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.