मुख्यमंत्री, पालकमंत्री महोदय आम्हाला वाचवा ; दुकाने उघडण्याची परवानगी द्या ….!
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचा सोशल मीडियावर पोश्टर ट्रेंड व्हायरल…
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोश्टर ट्रेंड राबवित भावनिक आवाहन करण्यात आले आहे.” मुख्यमंत्री ,पालकमंत्री महोदय आम्हाला वाचवा ” आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या असा मॅसेज पोश्टर ट्रेडच्या माध्यमातून देण्यात आला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण व होणारे मृत्यू यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेकांची उदरनिर्वाहासाठी वाताहत होत आहे यामध्ये जिल्ह्यातील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत आले असून अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा करावा लागत आहे.
असा आहे पोश्टर ट्रेंड –
पोश्टर ट्रेंड मध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री महोदय व्यापाऱ्यांनी दुकानाचे भाडे कसे भरायचे ? बँकेचे हफ्ते कसे भरायचे ? पगार कुटून द्यायचे ? खायचं कसे ? आणि जगायचे कसे ? गव्हर्नमेंट टॅक्स,लाईट बिल,टेलिफोन बिल,घरपट्टी भरायचं कुटून , पंधरा महिन्यापासून आम्ही सहकार्य करीत आहोत आता मात्र आम्ही हतबल झालो आहोत , पालकमंत्री मंत्री महोदय तुम्ही आमचे पालक आहात कृपया आमच्या वाढत असलेल्या अडचणी समजून घ्या , आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाचा भयंकर विस्फोट होत असताना रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त आदेशाने लॉकडाऊन घोषित करण्यात आला मात्र सतत वाढणारा कोरोना च्या प्रमाणे रुग्णांनाच्या जीवावर उठला आहे त्याच प्रमाणे आर्थिक कंबरडे मोडणारा ठरला असून लॉकडाऊन असल्याने पूर्णतः संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. यामुळे व्यापारी करणातून अर्थ चक्र थांबले यामुळे जिल्ह्यातील व्यापारी अडचणीत आले आहे त्याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया च्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे.