जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस मिळाल्याने१८ ऑगस्ट रोजी कागदपत्रांसह ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मंदाताई खडसे यांनी ईडीला डेंग्यू झाल्याचे वैद्यकीय कारण सांगून ईडी चौकशीला जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे ईडीच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या प्रकरणात या पूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत असून या जमीन खरेदी खरेदीत मंदाताई खडसे या दुसऱ्या खरेदीदार आहेत. सक्तवसुली संचालनालय मुंबई यांनी यापूर्वी मंदाताई खडसे यांना समन्स बजावले असता त्यांनी हजर राहण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान ईडीने पुन्हा समन्स काढून त्यांना बुधवारी कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले होते. मात्र डेंग्यू झाल्याचे वैद्यकीय कारण देऊन त्यांनी सदर चौकशी ला जाण्याचे टाळले आहे.