जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गत पाच वर्षातील शासकीय योजनांच्या माध्यमातून झालेल्या खर्चाबाबत आढावा घेण्यासाठी विधिमंडळ अंदाज समिती २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्ह्यात येणार आहे. समितीचे स्वागत करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ही समिती दोन दिवस शासकीय कामांची पाहणी करून योजनांचा आढावा घेणार आहे.
विधिमंडळ अंदाज समितीमध्ये ३२ आमदारांचा समावेश असून आमदार रणजित कांबळे हे प्रमुख आहेत. समिती २३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात मुक्कामी येणार आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे शासकीय विभाग प्रमुखांची बैठक समिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान समितीचे आमदार येणार असल्याने संबंधित विभाग प्रमुखांनी आपापल्या कार्यालयात बैठका घेऊन प्राथमिक आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.