जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव महापालिकेत सत्तांतरानंतर प्रथमच महासभेत शिवसेनेने ४२ कोटीची कामे रद्द करून १०० कोटींच्या कामांचा ठराव मंजूर केला आहे. शासनाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटीची कामे रद्द करून स्थगिती उठवावी यासाठी महानगरपालिकेने नगरविकास विभागाला पत्र पाठवले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी प्रधान सचिवांना शंभर कोटीच्या कामासंदर्भात माहिती दिली.
मे महिन्यात झालेल्या महासभेत शिवसेनेने ४२ कोटींची कामे रद्द करून शंभर कोटी देऊन फक्त रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी देणे घेणे बाकी आहे. महासभेने ही कामे रद्द केल्यामुळे प्रशासनाने नगरविकास विभागाला पत्र पाठवून ४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठवून ती कामे रद्द करण्यात यावी असे कळविले आहे.