जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | बहुचर्चित बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर बाबतीत भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, “सुनील झंवर हे माझ्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. माझ्याकडे कोणी नाही म्हणून दाखवावे..” असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे या वक्तव्याचे कोणत्याही राजकीय पक्षाने खंडन केले नव्हते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी एस पाटील यांनी टीका केली आहे.
या संबंधित बोलताना प्रदेश सरचिटणीस डी एस पाटील म्हणाले की, ‘आमदार गिरीश महाजन यांचे सुनील झंवर यांच्याशी संबंध असतील, आमचे नाही..! समाजात सब घोडे बारा टक्के नसतात.. आपणास आपल्या प्रतिमेची काळजी नसेलही; परंतु आजही काही लोक आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा जपतात. त्यामुळे आ. गिरीश महाजन यांनी यापुढे फक्त स्वतः व त्यांच्या पक्षापुरते मर्यादित बोलावे’, असा सल्ला त्याने दिला आहे.
आता उघडपणे या प्रकरणात काँग्रेसने उडी घेतल्याची चर्चा आहे. प्रदेश सरचिटणीस डी जी पाटील यांनी महाजन यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना सांगितले की, ‘झंवरशी त्यांचे संबंध ते कबूल करतील; परंतु घोटाळ्यातील संशयितांसोबत विनाकारण इतर राजकीय पक्षाचे नाव जोडू नये’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सुनील झंवर हे आपल्या तालुक्यात आल्यानंतरही ते काळे आहेत की गोरे आहेत हे आपण पाहिलेले नाही. त्यामुळे झंवर यांच्या सोबतच्या संबंधावर महाजन यांनी सर्व पक्षांना गृहीत धरू नये. त्यांचे संबंध असल्याचे महाजन यांनी मान्य केले आहे. मात सब घोडे बारा टक्के असे समजणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.