जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्ह्यातील प्रदेश तेली महासंघा तर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभासाठी सर्व तालुकाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांना आपापल्या तालुक्यात गुणपत्रके गोळा करण्यासाठी विनंती करणाने संदेश पाठवण्यात आले आहेत. सदर संदेशामध्ये काही बदल करण्यात आलेला असून त्या बदलाप्रमाणे पूर्वीचा मेसेज दुरुस्त करून किंवा नव्याने तयार करून प्रसारित करावयाचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
याअंतर्गत दहावी व बारावी साठी गुणांची अट शेकडा ७५ किंवा त्यापेक्षा अधिक करणे, पदवी पदवीका साठी गुणांची अट शेकडा ६५ किंवा त्यापेक्षा अधिक करणे, डॉक्टर, वकील, चार्टर अकाउंटंट यासाठी उत्तीर्ण असणे, गुणपत्रक गोळा करण्याची तारीख २५ ऑगस्ट २०२१ करणे असे बदल करण्यात आले असून यांची नोंद घेण्यात यावी असे अध्यक्ष व कार्यकारी मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.
गुणपत्रिका जमा करण्यासाठी श्री साई राम रेसिडेन्सी, रेल्वे स्टीशन रोड, जळगाव तसेच उमेश चौधरी 9595945279, अनिल रामदास पाटील 9892345701, प्रशांत सुरेश सुरळकर 9922223844, 8484880999 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्या आले आहे.