जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | आज वसंतस्मृती भाजपा कार्यालय जळगांव येथे भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत येत्या आगामी निवडणूका जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती जळगांव जिल्ह्यात माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी समारोप प्रसंगी सांगितले. या बैठकीत डॉ राजेंद्र फडके व माजी आ. स्मिता वाघ यांनी संघटनात्मक विषयात मार्गदर्शन केले.
दरम्यान, आगामी जिल्हा बँक व नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून यासाठी भाजप,राष्ट्रवादी,कॉग्रेस हे तिन्ही पक्ष कामाला लागले आहे. जिल्हा बँकेत एक हाती सत्ता घेण्यासाठी भाजप आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार हे निश्चित आहे. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी मध्ये गेल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे राष्ट्रवादी देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार आहे. यासाठी मंत्री गुलाबराव पाटील,माजी मंत्री सतीश पाटील,गुलाबराव देवकर यांनी नुकतीच खडसे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीचा तिढा खडसे कुटुंबियांच्या मागे लागला आहे आगामी निवडणुकांवर ईडीचा प्रभाव राहील असे दिसते, विद्यमान जिल्हा बँकेच्या अध्यक्षा खडसे यांच्या पुत्री रोहिणी खडसे – खेवलकर ह्या आहेत. यामुळे आगामी जिल्हा निवडणुक ही महाजन व खडसे यांच्या भोवती फिरणार हे निश्चित आहे.
संघटनात्मक आढावा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी केले व जिल्हा परिषदेच्या सूचना जिल्हा सरचिटणीस मधु काटे यांनी केल्या व आभार जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले या बैठकीला आ.मंगेश चव्हाण, जिल्हा परीषद अध्यक्षा ना.रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, सभापती ज्योती राकेश पाटील, उज्वला म्हाडके, जयपाल बोदर्डे, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य उपस्थिती होते असे जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी कळविले.