पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | बारामतीत राज्यातील पहिल्या पोर्टेबल कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे आज उद्घाटन करण्यात आले. हे पोर्टेबल सेंटर कधीही, कोठेही उभे करता येऊ शकणार असून जेथे रुग्ण संख्या अधिक असेल तेथे ते सहज हलवता येणार असल्याने यदाकदाचित कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिसून आल्यास याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असल्याचे दिसून येत आहे.
बारामतीत कुणाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान रुग्णसंख्या मोठ्या संख्येने निर्माण झाली होती त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे त्यातूनच संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी या पोर्टेबल कोबी सेंटरची मोठ्या प्रमाणावर मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आज बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सेंटरचे उद्घाटन करून सेंटरची पाहणी करत याबाबत माहिती घेतली.