जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मनसेचे महानगर अध्यक्ष निलेश अजमैरा यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांच्या उपस्थित यांच्या २० कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये प्रेवेश केला. यामुळे मनसे महानगरमध्ये तडा गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दादावाडी मंडल क्र.५ येथे समर्थ बुथ अभियाना प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत हि प्रवेश प्रक्रिया पार पडली.
या प्रसंगी निलेश अजमैरा यांनी सांगितले की, ‘आम्ही जळगाव शहराचे लोकप्रिय आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेऊन प्रवेश केला असुन पक्ष वाढविण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू. सोबतच जी जबाबदारी आम्हाला दिली जाईल त्याचे पालन करू.’ या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, मंडल अध्यक्ष शक्ति महाजन उपस्थित होते.