जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय जनता युवामोर्चा युवतींतर्फे शहरातल्या चेतनदास मेहता व जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. डॉ. घोलप, डॉ. रुपाली बेंडाळे, डॉ. अशोक जाधव व सिव्हिल रुग्णालयात डॉ. सिद्धार्थ चौधरी, स्टाफ कर्मचारी, सफाई कामगार, शिपाई व सेवेकरी यांना राखी बंध्नाय्त आली.
कोविड काळात आपल्या रुग्णांना सेवा देऊन अथक प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात टाकून जीव वाचवणाऱ्या अश्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपला आशिर्वाद सदैव तुमच्या सोबत असेल असं सांगत युवतींनी राखी बांधून हा सुवर्ण क्षण साजरा केला. यावेळी भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर युवती प्रमुख अबोली पाटील, युवती प्रमुख निकिता महाजन, युवामोर्चा चिटणीस काजल कोळी, दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी, आशा गोयर, शितल पाटील, शालिनी देवासकर, कीर्ती पाटील, स्वाती रेखी, भावना भिरुड, वैशाली वंजर उपस्थित होत्या.