जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या बिगुल वाजला असून जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेते व पदाधिकार्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तर काही राजकीय कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे यावेळी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी नेत्यानी प्रयत्त्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाला विश्वासात घेतल्यामुळे त्यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .
दरम्यान इच्छुक उमेदवार व पक्षाच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस ची बैठक आयोजित करणार असल्याची माहिती रा. कॉ . चे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांनी दिली. कोरोनामुळे सतत लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झालि आहे . या निवडणुकीची राजनीती ठरवण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांच्या खास बैठका सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील. आ. चिमणराव पाटील, माजी मंत्री सतीश पाटील यांनी नुकतीच राष्टवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. तसेच भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्याची बैठक पार पडली. बँकेची निवडणूक बिनविरोध करायची की, स्वतंत्र लढायची याबाबत अद्याप चर्चा सुरु आहे. निर्णय झालेला नाही. तसेच, कॉंग्रेस ने नुकतीच कॉंग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितत बैठक घेतली आहे. या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादीतर्फे घेण्यात येणार आहे