जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा :महावितरणचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांची नाशिक येथे त्याच पदावर बदली होऊन १० दिवस उलटले तरी अद्याप या पदावर कोणाचीही नियुक्ती कार्यात आलेली नाही. या पदाचा कार्यभार अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या कडे देण्यात आला होता. महावितरण मध्ये शहर कार्यकारी अभियंता जनसंपर्क अधिकही यांच्यासह अनेक सहायक अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. महावितारणात नुकत्याच रिक्त झालेल्या बदली प्रक्रियेबद्दल कर्मचार्यात रोष निर्माण झाला आहे. बदल्यांच्या विरोधात नुकतेच अभियंता संघटनेने आंदोलन केले होते. तरी अद्याप अनेत निर्णय प्रलंबित आहेत.