जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : फुटबॉल खेळाशी पन्नास वर्षापासून जवळकी असलेले व १९६० रोम येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताच्या फुटबॉल संघात प्रतिनिधित्व केलेले शाहिद हाकीम यांचे २२ ऑगस्ट रोजी गुलबर्गा येथे अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांना आज श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तसेच इतर क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षक व खेळाडूंच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्वप्रथम फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी एस एस हकीम यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय खेळाडूंना करून दिला शाहिद हकीम हे ऑलम्पिक मध्ये भारताचे खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केले असले तरी ते एक उत्कृष्ट असे प्रशिक्षक होते त्यासोबत ते अखिल भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक पंच म्हणून सर्वश्रुत आहे त्यांच्या पाच दशकांच्या फुटबॉल कार्याच्या आलेखावर त्यांना भारत सरकारने २०१७ चा द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरव केला होता. अशा या महान भारतीय फुटबॉलपटू चा मृत्यू झाल्याने देश एक चांगल्या खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना मुकला असल्याची खंत फारुक शेख यांनी व्यक्त केली आहे.
श्रद्धांजली साठी यांची होती उपस्थिती
जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुक शेख, बास्केटबॉल चे प्रशिक्षक वाल्मीक पाटील ,स्केटिंग चे प्रशिक्षक संजय पाटील , हॉकी चे प्रशिक्षक मुजफ्फर खान व लियाकत अली सय्यद, राष्ट्रीय खेळाडू शादाब सय्यद, टेबल टेनिस चे प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू विवेक आडवाणी, बुद्धिबळाचे प्रशिक्षक प्रवीण ठाकरे ,व्हॅलीबॉल चे भाऊसाहेब पाटील, डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या व हॉकी महाराष्ट्राच्या प्रा. डॉक्टर अनिता कोल्हे यांच्यासह सुदर्शन त्रिपाठी, जयेश दायमा, बुऱ्हाण चित्तलवाल, कुमारी पूर्वा हटकर, कृष्णा हटकर, युसूफ खान, अकबर खान, इक्बाल पिंजारी,इम्राण बिस्मिल्लाह, झुबैर खान,फहीम खाटीक, राहुल धुळणकर, शारिक सैय्यद, अल्तामश खान,अमर लोखंडे, अवैस खाटीक, पंकज पवार, फैसेल खान,अबरार सैय्यद, आदींची उपस्थिती होती.