जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होणार्या संभाव्य निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. बँकेचे निवडणून सर्वपक्षीय देऊन बिनविरोध व्हावी, म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी,या तीनही पक्षाचे नेते प्रयत्नशील आहेत. त्यात त्यांनी कॉंग्रेसला विश्वासात न घेतल्यामुळे कॉंग्रेस पक्षात तीव्र असंतोष पसरला आहे. त्या पार्शभूमीवर कॉंग्रेसने आता या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बँकेच्या प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत स्वबळावर लढवेल अशी घोषणा केली होती. त्याची प्रचीती या निमित्ताने दिसून येत आहे.या निवडणुकीची राजकीय तयारी गेल्या ८ ते १० दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी शिवसेना व भाजप नेते आजीमाजी आमदार इच्छुक उमेदवार यांनी मुंबईत एकमेकांच्या गाठीभेठी सुरु केल्या आहेत. राजकीय संघर्ष टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी अश्या या तीनही पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. परंतु निवडणुकीबाबत कॉंग्रेस पक्षाला विचारपूस केली नसल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात कॉंग्रेसची भूमिका मोलाची ठरणार आहे. कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र पॅनल देऊन सर्व २१ जागा लढवाव्यात असा निर्णय पक्षांनी घेतला आहे. त्या दृष्टीने चांगल्या सक्षम उमेदवारांचा शोध आणि त्यांच्या गाठीभेठी साठी प्रयत्न केला जाता आहे . निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून विशेष लक्ष दिले जाणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष संदीप पाटील प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा बँकेचे चोपडा येथील संचालक सुरेश पाटील, डी.जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, बँकेचे माजी उपाध्यक्ष आर. जी. पाटील,राजीव पाटील. अविनाश भालेराव, अशोक खलाणे, विजय महाजन, शाम तायडे आदि उपस्थित होते. मतदारसंघ मी हाय उमेदवार देण्या बाबत चर्चा झाली.
सर्वपक्षीय पॅनलमध्ये कॉंग्रेसला जागा वाढवून मिळावी यासाठी कॉंग्रेसचे हे दबाव तंत्र असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच इतर तिन्ही राजकीय पक्षांनी परस्पर बोलणी सुरु केल्याने कॉंग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचे सांगण्यात आले.