जळगाव राजमुद्रा वृतसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केलेल्या वक्तव्याने आक्रमक झालेल्या जळगावातील शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर धडक दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिकांनी भाजप विरोधात घोषणाबाजी देत भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी भाजप कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रवेश गेट बंद करीत शिवसैनिकांना प्रवेशास मज्जाव केला आहे. यावेळी पोलिसांनी देखील शिवसैनिकाना रोखून ठेवत भाजप कार्यालय परिसरातून शिवसैनिकांना बाजूला केले
राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, पण शिवसेनेने महिलांना पुढे करून भाजपा कार्यालयात आक्रमक भुमिका घेवून शिवसेना कार्यकर्त्यांनी कोंबड्याऐवजी वाघ आणले असते. भाजपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे महानगर प्रमुख दीपक सुर्यवंशी यांनी दिली.
दरम्यान नारायण राणे यांच्या प्रकरणावरून जळगावात चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी थेट भाजप कार्यकर्त्यावर केलेल्या मारहाणीच्या विरोधात महापौरांसह पदाधिकाऱ्या वर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितल्या नंतर भाजप विरिध शिवसेना असा नवा संघर्ष उभा राहिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी गुलाब वाघ, गजानन मालपुरे, शोभा चौधरी , सरीता माळी, अस्मिता पाटील, विराज कावडीया, मानसिंग सोनवणे,ज्योती शिवदे,प्रशांत सुरळकर,अमित जगताप,नगरसेवक गणेश सोनवणे, यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक आदी उपस्थित होते.
आक्रमक झालेल्या जळगावातील शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर धडक दिली. येथे पोलीस बंदोबस्त असल्याने शिवसैनिकांनी कार्यालयाच्या समोरच जोरदार आंदोलन केले.