जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव महानगर पालिका वर्तुळात पुन्हा वॉटर ग्रेस प्रकरण चर्चेला आले आहे, कारण राज्या सह हे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. कारण महासभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासना विरोधात वॉटर ग्रेस कंपनीने दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी ठराव केला होता परंतु त्याची तीन महिने उलटून देखील अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
मनपा वॉटर ग्रेस कंपनीला ठेका दिल्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या दंडाची आकारणी करून मक्तेदार आणि महापालिका यांच्यात वाद निर्माण झाला होता हा वाद औरंगाबाद खंडपीठात पोहचला आहे मक्तेदार वॉटर ग्रेस कंपनीचा हा वाद सोडवण्यासाठी वॉटर ग्रेस कंपनीने लवाद नियुक्तीची मागणी केली होती.
त्यानुसार मनपा प्रशासनाने लवाद नियुक्तीसाठी नुकत्याच झालेल्या महासभेत प्रस्ताव दिला होता या आहवालाची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी वॉटर ग्रेस कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल दाखल केलेली असून ती मागे घ्यावी अशी अट घातली होती त्यानुसार ठरवून तीन महिने उलटले तरी अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. एखाद्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासन नेहमी धडपड करीत असते परंतु ही प्रक्रिया आणि ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता का उशीर केला जात आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे