शिवसेनेतर्फे शहरात आंदोलन, घोषणाबाजी करून राणेंच्या वक्तव्याचा जोरदार निषेध
जळगाव राजमुद्रा वृतसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाड (जि. रायगड) येथे ‘जनआशीर्वाद यात्रे’नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माननीय ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून राज्यातील सामाजिक सलोख्यालाच जणू आव्हान दिले. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्या अनुषंगाने आज राज्यभरासह जळगावात सकाळी शिवसेनेतर्फे जोरदार आंदोलन, घोषणाबाजी करीत जळगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक श्री.विलास शेंडे यांना निवेदन देत राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन देत मागणी केली. त्यावर श्री.गवळी यांनी राणेंविरोधात भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 153-ब(1)(क), 505 (2), 500 व 506 यानुसार दुपारी दोनच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासमवेत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री.गुलाब वाघ, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, शिवसैनिक श्री.गजानन मालपुरे, मनपा विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, नगरसेवक श्री.विक्रम (गणेश) सोनवणे, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, सौ.सरिता माळी-कोल्हे, युवासेनेचे श्री.शिवराज पाटील, विराज कावडिया, अमित जगताप, राजेंद्र चव्हाण, जाकीर पठाण, जनार्दन अप्पा पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
.