जळगाव राजमुद्रा वृतसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या झालेल्या अटकेच्या निम्मिताने जळगाव शिवसेनच्या वतीने फटके फोडून जल्लोष करण्यात आला आहे. राज्य भरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या व्यक्तव्या वरून निषेध तसेच आंदोलन सुरु होती मात्र राणे यांना अटक होताच जळगाव शिवसेनचे वतीने जळगाव महापालिकेसमोर फटके फोडून आंदौत्सव साजरा करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजप विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने टाकली गेली आहे. नवा संघर्ष निवडणुकाच्या आधी दोन्ही राजकीय पक्षाचा सुरु झाला आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राणे यांना अटक केल्याने राज्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून ठेवण्यात आले आहे. यामुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.