जळगाव राजमुद्रा वृतसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा वरून आज भाजप – शिवसेनेत चागलाच संघर्ष पाहायला मिळाला आहे, राणे यांनी केलेल्या व्यक्तव्या च्या निषेधार्थ शिवसैनिकांनी थेट बळीराम पेठ्तील भाजप कार्यालयात धडक दिल्याने चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजप-शिवसेना कार्यकत्यांमध्ये यावेळी झटापटी झाल्याने शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर भिरकावण्या साठी आणलेल्या दोन निष्पाप कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान या संदर्भातील भाजप कार्यकर्ते कोंबड्या ना पाणी पाजवत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच शिवसैनिकांनी आणलेल्या कोंबड्यांची योग्य तो सोपस्कार करण्यात आला आहे.
भाजप कार्यालयावर कोंबड्या फेकल्या नंतर शिवसेना – भाजप कार्यकर्ते जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांन समोर आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकरत्यांची समजूत काढून दोघांचे तक्रारी अर्ज घेऊन एकमेकांनमधील वाद मिटून शांतेते रवाना करण्यात आल्याची माहिती शिवसेनेतील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दिली आहे.