जळगाव राजमुद्रा वृतसेवा | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद सध्या जळगाव जळगाव जिल्ह्यासह राज्यात जोरदार उमटू लागले आहे. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची वेळ पोलिसांना यावी हि बहुधा राज्यातील पहिली घटना आहे. तसेच जिल्ह्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेऊन चौफेर टीका केली. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात भाजप – शिवसेनचा संघर्ष सुरु झाला असून त्याचा परिणाम जिल्ह्याच्या भावी राजकारणावर काय होतो याकडे जाणकाराचे लक्ष लागून आहे.
नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून याच्या विरोधात त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे तर काही ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये धडक देऊन राणे यांना अटक करण्याची मागणी केली, तर दुसरी कडे त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजप मैदानात उतरली आहे, राणे याच्या समर्थनार्थ नेत्यानी आरोप – प्रत्यारोप सुरु केले त्यांच्या अटकेची कार्यवाही म्हणजे सरकारचा दुप्पटीपणा असल्याचा सुतोवाच त्यांनी केला राज्यात काही जिल्ह्यामध्ये महामार्ग रोखून धरला एवढ्यावर भाजप थांबला नाही तर राणे यांनी सुरु केलेली जनआशिर्वाद यात्रा पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त करून त्याची कमान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर सोपवली.
मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जळगावात शहर पोलीस स्टेशन गाठले त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली नारायण राणे यांच्या वर पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करून निवेदन देण्यात आला परंतु यावेळी शिवसेनेत असलेली गटबाजी पुन्हा उघडकीस आली माजी महानगराध्यक्ष यांनी महापौर यांच्या स्विय सहाय्यकांची यावेळी चांगलीच कान उघाडणी केली त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. शिवसेनेने अद्यापही शिवसेनेत निष्ठावान शिवसैनिकांना मान मिळत नाही असा आरोप माजी महानगर अध्यक्ष यांनी केला त्यामुळे परिसरात उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांन मध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल.
विषय होता निवेदनावर नावाचा उल्लेख न केल्यावरून एका माजी पदाधिकाऱ्यांने महापौरांच्या स्वीयसहाय्यकांची झाडाझडती घेतल्याने खडाजंगी झाली. त्यानंतर हा वाद वाढू नये म्हणून काही जणांनी मध्यस्थी करून शांत करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर उपस्थितांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिल्यानंतर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय घाटण्यात आले त्या ठिकाणी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाब वाघ, उपमहापौर भुषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख शोभा चौधरी ,शिवराज पाटील, अमित जगताप ,यांच्यासह शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून मागण्यांचे निवेदन पोलिसांना निवेदन दिले त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाने रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पदाधिकारी नगरसेवकांनी राणे यांच्या समर्थनात आंदोलन केले मात्र अद्याप तरी आमदार-खासदार हे रिंगणात आले नसल्याचे दिसून आले, त्यामुळे राणे यांच्या पाठीमागे या जिल्ह्यातून कोण – कोण नेते आहेत हे समजू शकलेले नाही
विशेष म्हणजे आगामी काळात नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या होणाऱ्या निवडणुकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी लक्ष काढणे आवश्यक असताना अशा अशा वातावरणात त्याकडे दुर्लक्ष होऊन त्याचे परिणाम राजकीय आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे काय होतो अशी प्रतिक्रिया ही काही नेत्यांनी व्यक्त केली आहे
जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न होत असताना अचानक घडलेल्या या घटनेचे पडसाद भविष्यात काय होऊ शकतात याकडे राजकीय लक्ष लागून आहे