यवतमाळ राजमुद्रा वृत्तसेवा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील पालघर पोलीस ठाण्यांमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जाणाऱ्या अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे. या संपूर्ण संदर्भात यवतमाळ, उमरखेड, यवतमाळ तपास पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळत आहे भाजपा केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे चांगलेची आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक करताना ” योगी है गॅसचा फुगा असून आले की सरळ चप्पल घालून महाराजांना हार घालण्यासाठी गेला…असे वाटते त्याच चपला घ्याव्यात ….आणि त्याच थोबाड फोडाव …! असे व्यक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केले होते. पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात लायकी आहे का तुझी महाराजांसमोर उभे राहण्याची असे देखील व्हायरल व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना दिसून येतात. हा व्हिडीओ भाजपच्या हाती लागला आहे.
दसरा मेळाव्यात झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या क्लिप्स भाजप कडून जमा करण्यात आले असून यासाठी न्यायालय लढाई लढण्याची तयारी भाजप करीत असल्याचे सूत्रांनी कळविले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास राजकीय परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे यामुळे भाजप-शिवसेना वाद विकोपाला जाणार आहे.