मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरात जोरदार पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले त्यांच्या विरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना महाड इथे न्यायालयात हजर करण्यात आले दंडाधिकारी यांनी त्यांना जामीन मंजूर केला दरम्यान या सगळ्या घडामोडी वर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राणे यांना त्यांनी टोला लगावत या प्रकरणावर मला जास्त बोलायचे नाही मी राणेंना फारसे महत्त्व देत नाही त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे ते बोलतात अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी राहुल वर केली आहे.
महाड न्यायालय पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जामीन मंजूर केला रात्री राणे हे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर झाले ट्विटरद्वारे सत्यमेव जयते असे विरोधकांना खोचक असे उत्तर दिले आहे.