भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | दोन मुलांना विष पाजून स्वतः च्या घरातल्या पंख्याला साडी च्या साह्याने महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ( खंडाळा ) ता. भुसावळ येथे घडले आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे ज्या तीन मुलांना विष पाजवण्यात आले ते घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आले असून मुलांची आईदेखील आत्महत्या केल्याने मृतावस्थेत आढळून आले आहे.
भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे पती– पत्नी व दोन मुले असा चौधरी परिवार वास्तव्यास होता. किशोर चौधरी हे खासगी फायनान्स बँकेत नोकरीला होते. मात्र, लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने गावी येवून शेती करत होते. सदर घटना घडली त्यावेळी किशोर चौधरी हे शेतात गेले होते. घरी त्यांनी पत्नी अश्विनी व दोन मुले होते.
दरम्यान घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही आत्महत्येचं कारण परिवारातल्या कोणत्याही सदस्याला माहित नसल्याचे सांगण्यात आले आहे याप्रकरणी स्थानिक पोलीस तपास करीत आहे.