जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेत येऊन विधानसभा लढवा.., सर्वांगीण विकास तसेच युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न निवडून येऊन पूर्ण करावे.. आम्ही आपल्या पाठीशी आहोत अशी खुली ऑफर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांना दिली आहे, आ चंद्रकांत पाटील यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमानिमित्त राजकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित झाले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना ऑफर देत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे विधान केले यामुळे उपस्थित राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भुवया उंचावल्या होत्या.
उद्योजक श्रीराम पाटील यांनी यापूर्वी देखील आपले नशीब राजकीय क्षेत्रात आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे नाव अधिक चर्चेत आले होते, अनेक राजकीय पक्षांकडून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिल्या जात असल्याचे सांगितले जाते सामाजिक कार्यात तसेच उद्योग क्षेत्रात श्रीराम पाटील यांचे नाव सध्या केळी पट्ट्यात आघाडीवर आहे त्यांनी निर्माण केलेली छबी त्यांची जमेची बाजू आहे राज्यातील अनेक नेत्यांची थेट संपर्क असल्याने अनेक युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी विशेष भर दिला आहे.