जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची चौकशी सुरू असताना ईडी ने धडक मोहीम राबवत खडसे यांची लोणावळा व जळगाव येथील मालमत्ता जप्त केली असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली होती. अद्याप ते डीडीच्या कस्टडीत आहे खडसे यांच्या पत्नी सौ मंदाकिनी खडसे यांची दर्शील याच प्रकरणात चौकशी सुरू आहे चौकशीकरिता त्यांना किडीले समजावले होते मात्र वैद्यकीय कारण देत मंदाकिनी खडसे यांनी पंधरा दिवसाचा कालावधी मुदतवाढ मागून घेतली आहे.
खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा असलेला खुला भूखंड 31 कोटी मध्ये असताना तो फक्त तीन कोटी मध्ये खरेदी केला याप्रकरणी ईडी कडून त्यांची चौकशी सुरूच आहे.
ईडी चा ससेमिरा अद्याप खडसे यांच्या मागे सुरूच असून तो संपलेला नाही कारण एकीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक तोंडावर असताना तर दुसरीकडे बारा आमदारांच्या विधानपरिषदेवर आमदार नियुक्तीचा विषय गाजत असताना पुन्हा चौकशीच्या फेऱ्या मध्ये खडसे अडचणीत आल्यामुळे त्याला राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे