(राजमुद्रा मुंबई) अंधेरी येथील एमआयडीसी भागातील झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेत काही भ्रष्ट अधिकारी व महादलाल याच्यामार्फत 10 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या गैरप्रकाराची सेवानिवृत्त न्यायधीशांमार्फत समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केलीं आहे.
विमल शहा हे आकृती/हब टाऊन विकासक आणि खोट्या जातीच्या दाखल्याच्या आधारावर मतदार, निवडणूक आयोग आणि प्रशासनाची दिशाभूल करून निवडून आले असून उच्चन्यायालयाने नगरसेवक पदावरून रद्दबातल ठरविलेल्या फ्रॉड मुरजी पटेल यांनी तत्कालीन एमआयडीसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अंदाजे10 हजार रुपयांच्या वर महाघोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परिणामी आजही शेकडो झोपडी धारक स्वतःच्या मालकीची घरे तोडू देऊनही प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत. गेल्या २० वर्षांपासून या नागरिकांना सदनिका उपलब्ध नसून भाड्या बाबत धनादेशही नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. विकासक एफएसआय च्या इमारतीला ओसी मिळवून सदर फसवणूक करणाऱ्यांनी ऑफिस व बस्तान घेऊन पलायन केल्याचे सांगण्यात येते.
विकासक विमल शहा, फ्रॉड नगरसेवक मुरजी पटेल व त्या-त्या वेळचे भ्रष्ट अधिकारी यांची सखोल चौकशी करावी व सदनिकेपासून वंचितांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव श्रवण गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा राजभवना समोर डॉ राजन माकणीकर आमरण उपोषण करतील असा इशाराही निवेदनामार्फत मुंबई मा. पोलीस आयुक्त व राज्यपालांना देण्यात आला आहे.