जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी एकनाथराव खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेलो ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सर्वपक्षीय पॅनल चे निमंत्रण दिले यात त्यांना कोणताही शह देण्याचा प्रयत्न नसून वीस वर्षात पहिल्यांदा मुंबईच घर त्यांच पाहिलं असे वक्तव्य पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वपक्षीय पॅनल ची चर्चा सुरू झाले आहे.पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी मागील आठवड्यात एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली ,त्यानंतर काँग्रेस ने देखील स्वबळाची भाषा केली आहे दुसरीकडे भाजपाची अंतर्गत रणनीती सुरू आहे गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील अडकित्ता बागेत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.इच्छुक उमेदवारांची चाचपणी देखील झाली दुसरीकडे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा आहे.परंतु त्यांची शिष्टाई कितपत यशस्वी होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.दुसरीकडे सर्वपक्षीय पॅनल असले तरी मातब्बर नेत्यांना सामावून घेणे तारेवरची कसरत होणार आहे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की पालकमंत्री या नात्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे ते ज्येष्ठ असल्यामुळे मी त्यांच्या निवासस्थानी गेलो वीस वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदा त्यांचं मुंबईचे निवासस्थान पाहिल, लवकरच सर्वपक्षीय बैठक होऊन त्यानंतर जागांची चर्चा होणार आहे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले