जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | खडसे यांना शह देण्यासाठी कुठली केळी खेळत नाही आपल्याला देखील जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करायचे आहे असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे वीस वर्षात पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्यासोबत सर्वपक्षीय निवडणूक व्हावी यासाठी बोलणी केली आहे यासंदर्भात इतरत्र नेत्यांची देखील बोललो माझे सुरू आहे.
दरम्यान, भाजप जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभा करीत असल्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत येण्याची दाट शक्यता आहे. पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न चालविले आहे. यासाठी ते भाजप राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत मात्र भाजपने स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी दर्शवल्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे शक्य नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाजप नेते गिरीश महाजन यासंदर्भात नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.