जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | रस्त्याच्या झालेल्या परिस्थितीवरून जळगाव राष्ट्रवादीकडून महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. शहरात रस्त्यांची झालेली दुर्दशा चिखल धूळ याने त्रासलेले जळगावकर तसेच विविध भागांमध्ये असलेल्या गटारीच्या समस्या, प्रभागातील बंद असलेले पथदिवे अशा अनेक नागरिक समस्या जळगाव शहरात दिसत असून गेल्या अनेक कित्येक वर्षापासून आश्वासना व्यतिरिक्त आपल्याला काहीच मिळाले नाही. जळगावकर जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त असून मात्र अगदी मूलभूत सुविधा जर आपल्याला मिळत नसतील तर काय उपयोग ? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केलेला आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार असताना मात्र जळगावात आता राष्ट्रवादीने घरचा आहेर देत शिवसेनेने विरोधात शड्डू ठोकला आहे.
जळगावकर भरत असलेला कर याबाबत सत्ताधाऱ्यांना आता समस्या विषयी विचारण्याची वेळ आली आहे. किती दिवस अजून शांत बसणार असा सवाल देखील राष्ट्रवादीने जळगावकरांना विचारला आहे. झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी उद्या 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनआंदोलनात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केले आहे. आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना अभिषेक पाटील यांनी आंदोलन हे कोणी राजकीय पक्षाचे नसून जळगावकरांनी जळगावकरांसाठी उभारलेले आंदोलन आहे.