आमची ईडी लागली तर आता सीडी दाखवा : आमदार गिरीश महाजनांचे आव्हान..
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | सध्या सुरू असलेल्या ईडी विरुद्ध सिडी हा वाद विकोपाला गेला आहे, मात्र आमची ईडी तर लागली आहेच आता तुम्ही तुमची सीडी दाखवा असे थेट आव्हान आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना दिले आहे.
महाजन यांनी खडसे यांना थेट आव्हान दिल्यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली आहे सीडी प्रकरणाबाबत अनेकांनी दावे-प्रतिदावे केले होते मात्र ते अद्याप पर्यंत सत्यात उतरलेले नाहीत यामुळे खरंच सीडी आहे का ? याबाबत राजकीय नेत्यांमध्ये विविध चर्चा रंगली आहे. त्यातच आज भाजप नेते आ गिरीश महाजन यांनी थेट सिडी प्रकरणावरून आव्हान केल्यामुळे खडसे, महाजन राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आटोपल्यावर ते पत्रकारांशी संवाद साधत होते याप्रसंगी त्यांनी राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचा आरोप करीत टीकास्त्र सोडलं आहे, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना अद्यापपर्यंत आघाडी सरकार आल्यापासून निधी न मिळाल्याने आमदार गिरीश महाजन यांनी महाविकासआघाडी वर टीका केली आहे