जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात डॉ अश्विनी विनोद देशमुख यांचा नेल्सन मंडेला अवार्ड 2021 मिळाला या निमित्ताने आज सत्कार करण्यात आला, राष्ट्रवादीत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सामाजिक कार्यात डॉक्टर अश्विनी देशमुख यांनी दाखवलेले दातृत्व याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला प्रभागात विविध उपक्रमातून केलेले विकास काम ही त्यांची जमेची बाजू आहे असे उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर देशमुख त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर , माजी खा. मोरे , माजी पालकमंत्री सतीश पाटील, माजी विरोधी पक्षनेते माननीय एकनाथराव खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष माननीय अरुण गुजराथी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, गुरुमुख जगवाणी , मनीष जैन, ग्रंथालय प्रदेश अध्यक्ष उमेश दादा पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, मंगला पाटील व सर्व फ्रंटल चे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.