जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज ईडी च्या कारवाई संदर्भात भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा बैठकी मध्ये खडसे यांनी आपली भूमिका मांडत , पक्ष बदलला म्हणून किती छड कराल अशा पद्धतीने छळणे योग्य नाही.. जावायला तरी त्रास द्यायला नको होता.. मी तर माझी मानसिकता केली आहे… जेवढं छढायच तेवढं छडा … जेवढे बदनाम करायचं तेवढं करा मी काय झोकणारा नाही.. रुकणारा नाही.. अशी भूमिका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मांडली आहे.
भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे अद्याप पर्यंत त्यांचा जामीन झालेलं नाही. यामुळे खडसे यांनी जावायला तरी छडायचं नको होतं असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या बैठकीत केला आहे.
जिल्हा राष्ट्रवादीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये खडसे यांच्या वाढदिवसा निमित्ताने राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची भूमिका तसेच जबाबदाऱ्या या विषयावर नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राष्ट्रवादी नेहमी गटबाजी दिसून येते मात्र या बैठकी दरम्यान सर्वच नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. माजी मंत्री खडसे त्यांचे जावई यांना ईडी ने अटक केली यासंदर्भात आज जाहीर बैठकीत त्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त करून दाखवली आहे.
यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर , माजी खा. मोरे , माजी पालकमंत्री सतीश पाटील, माजी विरोधी पक्षनेते माननीय एकनाथराव खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष माननीय अरुण गुजराथी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, गुरुमुख जगवाणी , मनीष जैन, ग्रंथालय प्रदेश अध्यक्ष उमेश दादा पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, अभिषेक पाटील , मंगला पाटील व सर्व फ्रंटल चे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.